अजित पवार यांनी ‘त्या’ जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले, अन् हा दिला सल्ला

| Updated on: Feb 28, 2023 | 7:27 PM

VIDEO | शासकीय जाहिरातीवरून अजित पवार आक्रमक, शिंदे-फडणवीस सरकारला विचारला थेट सवाल, बघा काय म्हणाले पवार

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आज देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सभागृहात एका शासकीय जाहिरातीचा फोटच दाखवला. यावेळी अजित पवार आक्रमक होत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ही जाहिरात बसच्या संदर्भात होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता. या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या बसच्या काचा तुटलेल्या होत्या. याचबसवर मुख्यमंत्र्यांचा हसतानाचा फोटो लावलेला होता. यावरून या बसची अवस्था पाहून मुख्यमंत्री हसतायत का? ही कसली दळभद्री बस असा खोचक सवालही अजित पवार यांनी त्यांना केला आहे. जाहिरातीवर इतका खर्च केला बस तरी चांगली दाखवायची ना? जाहिरात देताना किमान व्यवस्थित देत जा, असा सल्लाच अजित पवार यांनी सरकारला दिला आहे.

Published on: Feb 28, 2023 07:24 PM
शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेऊ नये म्हणून हालचाली सुरू, ठाकरे गटाकडून कोणता नवा प्लान?
एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकारकडून पुन्हा आश्वासन; ‘या’ तारखेलाच होणार पगार