Breaking | ठाण्यात बॅनरबाजी, लसीकरण कॅम्पवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली
ठाण्यात लसीकरण मोहिमेचा कॅम्प लावण्याच्या मुद्दयावरून आणि बॅनरबाजीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रचंड जुंपली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घुसून गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं.

लसीकरण आवाहनाचे बॅनर शिवसेनेने फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. आज राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी महापौर दालनात जाऊन महापौर नरेश म्हस्के यांना निवेदन देताना त्यांनी लसीकरण मोहिमेच्या कॅम्पवरून आणि बॅनरबाजीवरून महापौरांना जाबही विचारला. यावेळी नजीमबुल्ला यांनी लसीकरणासाठी 20 लाखांचा धनादेश दिला. मात्र, महापौरांनी धनादेश घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी निवेदन घेण्यास नकारही दिला.