Chhagan Bhujbal : छगन भूजबळांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर

| Updated on: Dec 20, 2024 | 11:42 AM

अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा पत्ता मंत्रिमंडळातून का कापला याची माहिती आता समोर आली आहे. नाशिकमध्येच सर्व आमदारांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाला विरोध केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुती सरकारमधील मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ हे आक्रमक झालेत. अजित पवार यांच्याकडे ते इशारा देताय. मात्र नाशिकमधील लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळेच भुजबळांचा पत्ता कट झाल्याचे सूत्रांकडून कळतंय. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा पत्ता मंत्रिमंडळातून का कापला याची माहिती आता समोर आली आहे. नाशिकमध्येच सर्व आमदारांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाला विरोध केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशकातील सर्व आमदारांनी छगन भुजबळांना मंत्रिपद देऊ नका, अशी अजितदादांकडे विनंती केली. जर छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यास नाशकातील सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला होता. दरम्यान, निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याने पक्षातील लोकांची छगन भुजबळ यांच्यावर नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छगन भुजबळांनी बळजबरीने मुलगा पंकज भुजबळ यांच्यासाठी विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली, त्यामुळे नाराजी पाहायला मिळतेय. छगन भुजबळांनी आपल्या मुलासाठी केलेलं कृत्य पक्षातील वरिष्ठांना आवडलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर समीर भुजबळांनी पक्षविरोधात जाऊन अपक्ष लढल्याने पक्षश्रेष्ठींना आवडलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिपद न मिळाल्याने

Published on: Dec 20, 2024 11:42 AM