‘मी मराठी भाषेत बोललो…’, जागावाटपावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले
लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन-तीन जागा येणार अशी चर्चा आहे. यासंदर्भात अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता...
मुंबई, ७ मार्च २०२४ : महायुतीच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत खलबलं झालीत. ४८ जागांच्या वाटपावर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत तीन राऊंडची बैठक झाली आणि आता अंतिम शिक्कामोर्तब भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत होणार आहे. असे असताना लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन-तीन जागा येणार अशी चर्चा आहे. यासंदर्भात अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता अजित पवार काहिसे भडकले. अजित पवार यावर उत्तर देताना म्हणाले, ‘मी, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आम्ही येत्या दोन दिवसात एकत्र बसून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ’, असं अजित पवार म्हणाले.