शरद पवारांच्या पत्नीला बारामतीच्या टेक्सटाईल कंपनीत जाण्यापासून रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्… नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 18, 2024 | 10:32 AM

बारामती येथील एका टेक्स्टाईल पार्कमध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रोखण्यात आलंय. त्याचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. या टेक्स्टाईल कंपनीच्या अध्यक्षा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासणी आणि त्यांच्या ताफ्याला रोखण्यात आल्यानंतर वाद रंगत असताना आता बारामती येथील एका टेक्स्टाईल पार्कमध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रोखण्यात आलंय. त्याचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. या टेक्स्टाईल कंपनीच्या अध्यक्षा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. या टेक्स्टाईल कंपनीत कॉटनकिंग सारख्या बँडसह अनेक कपड्यांची निर्मिती आणि विक्री देखील होते. खरेदीसाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, त्यांच्या बहीण गीता जाधव आणि नात रेवती सुळे अशा तिघी होत्या. मात्र आरोपानुसार प्रतिभा पवार यांची गाडी पाहून सीओने फोनवरून दिलेल्या आदेशामुळे वॉचमनने गेट बंद केलं. जवळपास अर्धा तास गेट का बंद करण्यात आलं यावर फोनकरून विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांना आत सोडण्यात आलं. विशेष म्हणजे आता सर्व व्यवहार आणि दुकानं सुरू असताना फोनवरून गेट बंद कऱण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे पुन्हा आदेश मिळाल्याशिवाय गेट उघडू शकत नाही, असं उत्तर सुरक्षा रक्षकाने शरद पवारांच्या पत्नीला दिलं.

Published on: Nov 18, 2024 10:32 AM
Eknath Shinde : असं नेमकं काय झालं? राज ठाकरे अन् शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर मुख्यमंत्री स्पष्ट म्हणाले….
मनसेनं ‘खुर्ची’ टाकली, संजय राऊत ‘खाट’ टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा