शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, अर्धा तास गेटवरच अन्…, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 17, 2024 | 4:24 PM

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रवेश करण्यात अडवण्यात आलं. त्यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रवेश करण्याची परवानगी न देता त्यांना अर्धा तास गेटवरच थांबवलं.

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रवेश करण्यात अडवण्यात आलं. त्यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रवेश करण्याची परवानगी न देता त्यांना अर्धा तास गेटवरच थांबवलं. प्रतिभा पवार यांच्यासोबत त्यांच्या नात रेवती सुळे या देखील होत्या. दोन्ही जण टेक्स्टाईल पार्क येथे खरेदीसाठी गेल्याची माहिती मिळतेय. मात्र टेक्स्टाईल पार्कच्या गेटवरच प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना अडवलं. यावेळी प्रतिभा पवार आपल्याला प्रवेश का दिला जात नाहीये, असा सवाल तेथील सुरक्षा रक्षकाला करतात. त्यावर वरिष्ठांकडून कोणालाही आत सोडण्यास परवानगी नसल्याचं गेटवरील सुरक्षा रक्षकाने उत्तर दिले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, प्रतिभा पवार यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नातीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास का अडवण्यात आलं? याबाबत टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडीओवरुन आता बारामतीचं राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास का रोखण्यात आलं. याचं कारण अद्याप समोर आले नाही.

Published on: Nov 17, 2024 04:24 PM
Deepak Kesarkar : ‘ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा राजकीय वारसदार…’, दीपक केसरकराचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut : राज ठाकरेंच्या सभेत रिकामी खूर्ची, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, ‘आपल्या सभेत आपण त्यांच्यासाठी…’