शरद पवार यांनी ठरवलं दादांची घरवापसी नाहीच! एकदा परत आले, आता दुसऱ्यांदा नो चान्स!

| Updated on: Aug 25, 2023 | 10:45 PM

VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठरवलं... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांना संधी नाही, शरद पवार नेमकं काय म्हणाले? बघा स्पेशल रिपोर्ट... शरद पवार यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?

मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | अजित पवार यांच्याबद्दल शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. अजित पवार यांना पक्षात परत येण्यासाठी संधी नाही. असं म्हणत पुन्हा एकदा राष्ट्रवादीत अजित पवार यांना पक्षात परत घेणार नसल्याचे म्हणाले. माध्यमांनी अजित पवार यांना राष्ट्रवादीत पुन्हा संधी देणार का असा सवाल केला असता शरद पवार म्हणाले, ‘एकदा कोणती भूमिका घेतली असेल आणि त्यात बदल केला असले तर ती संधी झाली. एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गाने जाणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना संधी दिली होती, असं सांगतााच पण संधी मागायची नसते. संधी द्यायची नसते. आमची हीच भूमिका आहे.’, असे शरद पवार म्हणाले. यावरूनच शरद पवार यांची भूमिका स्पष्ट असल्याचे दिसतेय ती म्हणजे, अजित पवार यांनी पुन्हा संधी मागू नये आणि त्यांना संधी देणार नाही… बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 25, 2023 10:44 PM
डीआरआय पुणे युनिटकडून मोठी कारवाई, तब्बल १०१ किलो मेथाक्युलोन ड्रग्ज
लोकसभा निवडणूक २०२४ चा ताजा सर्व्हे, महाराष्ट्रात ‘महायुती’वर ‘मविआ’ भारी