पार्लमेंटमध्ये चाललंय काय? नव्या संसदेच्या उद्घाटनावर शरद पवार यांचा आक्षेप, काय म्हणाले…
VIDEO | नवं संसद भवन उद्धाटन सोहळ्याला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निमंत्रणाबाबत शरद पवार यांचं भाष्य
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी साधु, संत-महंतांची हजेरी होती. मंत्रोच्चारात संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. यावेळी सर्व धर्मीयांची प्रार्थना सभाही झाली. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप दर्शवत प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड काम सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ते पाहता जे आता पार्लमेंटमध्ये चाललंय यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठी नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे, असा आक्षेप शरद पवार यांनी नोंदवला. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रण देण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थित होते. त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रण द्यायला हवे होते असेही त्यांनी म्हटले.