हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, अजित पवारांवरील ‘त्या’ प्रश्नावर शरद पवारांचं थेट उत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यावर काही बोलत नाहीत? हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा असं उत्तर पवारांनी दिलं. मुंबईमधील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पवारांनी पुणे अपघात प्रकरणावरून प्रश्न विचारले, त्यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना ते आक्रमक झाले.
पुण्याचे पालकमंत्री पुणे अपघातावर का बोलत नाहीत हे त्यांनाच विचारा, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पुणे अपघात प्रकरणावर अजित पवार का भाष्य करत नाही? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर शरद पवारांनी हे उत्तर दिलं आहे. मुंबईमधील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पवारांनी पुणे अपघात प्रकरणावरून प्रश्न विचारले, त्यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना ते आक्रमक झाले. तर अजित पवारांवरील प्रश्नानंतर या प्रश्नाला जोडून एका पत्रकराने, या प्रकरणातील आरोपीच्या वकिलासोबत तुमचे संबंध असल्याच्या चर्चा आहेत असं म्हटलं. यावर बोलताना, एखाद्या वकिलाला मी भेटलो असेल तर त्याचा संबंध याच्याशी लावता तुम्ही, प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणं गरजेचं नाही, असेही शरद पवार म्हणाले.
Published on: May 24, 2024 06:12 PM