शरद पवार अनवाणी आंदोलनात, दोन्ही पायाला पट्टी अन् हातात हात घेऊन घेतला आधार; VIDEO व्हायरल
. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा होता. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी होते. तब्येत बरी नसताना आणि वय बाजूला ठेवून शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे देखील काही वेळ या मोर्चामध्ये सामील झाल्याचे दिसले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ जोडे मारो मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्या दरम्यानचा शरद पवारांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शरद पवार हे मविआच्या जोडेमारो आंदोलनात अनावणी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियाच्या मोर्च्यात शरद पवार काही अंतर हे अनावणी चालत सहभागी झाले होते. हुतात्मा चौकात अभिवादन करताना शरद पवार नुसते अनावणी नाहीतर त्यांच्या दोन्ही पायाला पट्टी बांधल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे छत्रपती शाहू महाराज देखील या अंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार ही त्यांच्या सोबत होते. एकमेकांच्या हातात हात घेऊन शरद पवार आणि शाहू महाराज आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.