Special Report | ‘जमालगोटा’ शब्दावरुन राजकारण तापलं, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी

| Updated on: May 29, 2023 | 6:45 AM

VIDEO | 'जमालगोटा'वरून वार-पलटवार, जमालगोटाची भाषा शिंदेंना शोभते का? कुणाचा सवाल, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जमालगोटा’ या शब्दाचा वापर केल्याने विरोधक संतापले. विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली आणि टीका करताना जमालगोटा या शब्दाचा प्रयोग केला. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या या शब्दावर आक्षेप घेतल्यानंतर अजित पवार यांनीही त्याच्यावर टीका केली. या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेनी जमालगोटा या शब्दाचा अर्थ समजून सांगितला. जमाल गोटा ही औषधी वनस्पती आहे. बियांच्या स्वरूपातही उपलब्ध, तर बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठीही त्याचा वापर होता. मात्र संसदेच्या लोकार्पण कार्यक्रमावर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हे वाकयुद्ध आता जमाल गोटापर्यंत येऊन पोहोचलंय.

Published on: May 29, 2023 06:45 AM
‘आपण देशाला पुन्हा काही वर्ष मागे नेतोय’, शरद पवार यांनी काय व्यक्त केली भीती
गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे म्हटले…