Special Report | साडे ४ तासांचा ‘पवार’प्ले! पवारप्ले संपला? की नवा सुरु झाला?
VIDEO | Special Report | पवारप्ले संपला? की नवा पॉवरप्ले सुरु? 9 ज्येष्ठ नेते एकीकडे, अजित पवार दुसरीकडे? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर पवारप्ले संपला? की नवा पॉवरप्ले सुरु? अशा चर्चा होताना दिसताय. जवळपास सर्वच बडे नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असे म्हणत विरोध करताय तर अजित पवार हा निर्णय योग्य असल्याचे म्हणताय. राजीनाम्याची तयारी स्वतः शरद पवार यांनी दाखविली असली तरी पुनर्विचारावेळी शरद पवार कुणाचं ऐकणार कार्यकर्ते, नेते की अजित पवार यांचं…? दरम्यान शरद पवार यांनी केलेली निवृत्तीची घोषणा हे राष्ट्रवादीतील ऐतिहासिक नाट्य असल्याची ही चर्चा आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार म्हणून दोन दशकं गल्ली ते दिल्ली चर्चिले गेलंय. त्यांनीच राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादीत ड्रामा सुरू झाला. पद सोडलं तरीही काम करत राहिल असे म्हटलं तरी राजीनाम्याला विरोध सुरूच होता, नेमकं कार्यकर्त्यांचं म्हणणं काय होतं. आता पुढे नेमकं काय होणार? बघा स्पेशल रिपोर्ट