शरद पवार धमकी प्रकरणात अपडेट, मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई

| Updated on: Jun 12, 2023 | 6:36 AM

VIDEO | शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांची काय कारवाई?

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना ही जीवे मारण्याची ही धमकी दिली होती त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र या धमकी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. शरद पवार धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातून सागर बर्वे या युवकाला अटक करण्यात आली आहे. सागर बर्वे हा युवक स्वतः आयटी इंजिनियर असल्याची माहिती मिळत आहे. याने फेक अकाऊंट तयार करून त्यांने शरद पवार यांना धमकी दिली होती. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली आहे. सुप्रिया सुळे याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांना भेट दिली होती. दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून सौरभ पिंपळकर या नावाच्या ट्वीटर हँडलवरून शरद पवार यांना ही जीवे मारण्याची धमकी दिली होती.  त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव होते तर शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर या तरूणाचा देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 

Published on: Jun 12, 2023 06:30 AM