अजित पवार यांना शरद पवार राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संधी देणार? काय म्हणाले शरद पवार?

| Updated on: Aug 25, 2023 | 4:10 PM

VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीमध्ये येण्याचे परतीचे दोर कापले? शरद पवार अजितदादांबद्दल थेटच म्हणाले... बघा काय म्हणाले शरद पवार?

सातारा, २५ ऑगस्ट २०२३ | अजित पवार हे आमचे नेते आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी आज सांगलीमध्ये केले. मात्र अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्याबाबत अवघ्या ५ तासात शरद पवार यांनी यु-टर्न घेतल्याची भूमिका पाहायला मिळाली. माध्यमांनी शरद पवार यांना अजित पवार यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये संधी देणार का? असा सवाल केला असता शरद पवार यांनी आपली भूमिकाच बदलल्याचे पाहायला मिळाले.‘एकदा कोणती भूमिका घेतली असेल आणि त्यात बदल केला असले तर ती संधी झाली. एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गाने जाणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना संधी दिली होती, असं सांगतााच पण संधी मागायची नसते. संधी द्यायची नसते. आमची हीच भूमिका आहे.’, असं शरद पवार यांनी सांगितलं.’ शरद पवार यांनी या केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत पुन्हा सामील करून घेण्यासाठी शरद पवार तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Aug 25, 2023 04:09 PM
शरद पवार यांचं ‘त्या’ वक्तव्याबाबत अवघ्या पाच तासात यू-टर्न; म्हणाले, ‘मी असं बोललोच नाही’
शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत, म्हणाले…