दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार? शरद पवार आज अमित शाह यांची भेट घेणार, पण का?

| Updated on: Dec 14, 2023 | 4:28 PM

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शरद पवार अचानक अमित शाह यांना भेटणार असल्याने या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर पवार-शाह यांची ही भेट असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२३ : आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसणार आहे. कारण आज रात्री दिल्लीत दोन बड्या नेत्यांची भेट होणार आहे. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा पेटलेला आहे तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदी हा मुद्दा देखील चर्चेत आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शरद पवार अचानक अमित शाह यांना भेटणार असल्याने या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर पवार-शाह यांची ही भेट असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. इथेनॉलच्या प्रश्नावर शरद पवार हे अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही आधी शरद पवार हे अमित शाह यांच्या भेटीसाठी जाणार आहे. शरद पवार यांच्यासोबत इतर कोणते नेते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Published on: Dec 14, 2023 04:28 PM
शरद पवार यांचं पंतप्रधान पद कसं हुकलं? प्रफुल्ल पटेल यांनी केला मोठा खुलासा
आधी संसदेची रेकी मग घुसखोरी, महाराष्ट्रातील अमोल शिंदे अटकेत; मोठी माहिती उघड