‘महायुतीचे काळे कारनामे…’, शरद पवार गटाचं अनोखं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं पत्रकार परिषदेच्या ठिकाणी महायुतीच्या काळ्या कारनाम्याचे फुगे लावल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या या पत्रकार परिषदेला 'महायुतीचे काळे कारनामे' असंच नाव देण्यात आलं होतं. शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर टीका केली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांची मुंबईमध्ये आज महत्वाची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेच्या पूर्वीच शरद पवार गटाचं अनोखं निदर्शन पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं पत्रकार परिषदेच्या ठिकाणी महायुतीच्या काळ्या कारनाम्याचे फुगे लावल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या या पत्रकार परिषदेला ‘महायुतीचे काळे कारनामे’ असंच नाव देण्यात आलं होतं. ‘महायुतीचे काळे कारनामे’, असे नावं दिलेल्या पत्रकार परिषदेतून जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस-पवार सरकारमधील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारी या घटनांवर भाष्य करत काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. तर यावरच टीका करण्यासाठी आणि हे सर्व घोटाळे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावरून एका योजनेची घोषणा केली गेल्याचेही पाहायला मिळाले.