राष्ट्रवादीच्या ‘त्या’ व्हिडीओला देवेंद्र फडणवीस यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’नं उत्तर
VIDEO | राष्ट्रवादीच्या 'त्या' व्हिडीओवर टि्वट करत देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर, काय आहे प्रकरण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून ओबीसी सेलतर्फे दोन दिवसांचे निवासी शिबिराचे आयोजन नागपुरात करण्यात आलं आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले. या दोन दिवसीय निवासी शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी आरक्षण मिळण्यापूर्वीचा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ दाखवत निशाणा साधला. तर या व्हिडीओला आता भाजपनं लाव रे तो व्हिडीओ स्टाईलनं प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तर सोयीची चोरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदा असल्याची टीका करण्यात आली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने आज नागपूरच्या ओबीसी मेळाव्यात ओबीसी आरक्षण मिळण्यापूर्वीचा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ दाखविला.’ पण, धुर्तपणा इतका की, 20 जुलै 2022 रोजी ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतरचा (म्हणजे हे सरकार आल्याबरोबर 20 दिवसांत आरक्षण मिळाल्याचा) व्हीडिओ दाखविला नाही. असो, सोयीची चोरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदाच! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जुलै 2022 रोजीच्या पत्रपरिषदेतील व्हीडिओ) असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओसह करण्यात आलं आहे.