ऐन निवडणुकीत माघारीचे संकेत, पण कारण काय? बारामतीऐवजी अजितदादा कुठून लढणार?

| Updated on: Aug 16, 2024 | 12:24 PM

दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. अशातच अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. बारामतीतून लढण्यास रस नाही, असं सांगताना दादांनी मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामतीऐवजी अजितदादा कर्जत जामखेडमध्ये लढू शकतात.

अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य फार मोठं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्याचे आणि मुलगा जय पवार यांना तिकीट देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिलेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील लढतीत पराभव झाला आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लढण्यात रस नाही, असं वक्तव्यच अजित पवार यांनी केलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीतून ७ लाख ३१ हजार ४०० मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७३ हजार ९७९ मतं मिळून पराभव झाला. म्हणजेच अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना तब्बल ४७ हजार ३८१ मतांची आघाडी मिळाली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 16, 2024 10:46 AM
शरद पवारांसोबत पुन्हा जाणार? घसवापसी करणार? अजित पवार एकाच शब्दात म्हणाले….
जरांगे पाटलांनी उमेदवार दिल्यास कुणाला फटका? किती जण विधानसभेच्या आखाड्यात? कोण नफ्यात, कोण तोट्यात?