‘दम नाही बुआ, नमस्कार’…. अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Sep 22, 2024 | 4:06 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी राजकीय दौरे, संवाद यात्रा काढत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांची देखील जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्टाईने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीच्या नेत्यांचा लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घेऊन नागरिकांशी संवाद साधणं सुरू आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे. आज अजित पवार या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे होते. यावेळी अजित पवार यांची जाहीर सभा झाली. मोहोळ येथे त्यांनी नागरिकांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधला. मोहळचे विद्यमान आमदार यशवंतच माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात अजित पवार यांची जाहीर सभा झाली. यासभेतून अजित पवार यांनी आपल्या स्टाईने मिश्कीलपणे उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले. बघा व्हिडीओ अजित पवार नेमंक काय म्हणाले?

Published on: Sep 22, 2024 04:06 PM
‘लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही’, मराठा समाजातील महिला अजित पवारांवर भडकली
‘अरे पठ्ठ्या यात तू फुशारकी मारली का? ‘लाडकी बहीण’ योजना काय तुझ्या…’, अजितदादांचा कोणावर निशाणा?