Eknath Shinde यांनी एक्का काढला अन् आपण पत्त्यांचा डाव हरलो, जयंत पाटील काय म्हणाले?

| Updated on: Sep 05, 2023 | 1:30 PM

VIDEO | दिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 'एकनाथ शिंदे यांनी एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो', असे वक्तव्य का केले?

सांगली, ५ सप्टेंबर २०२३ | इस्लामपूरमध्ये वैद्यकीय उपकरणे प्रदान कऱण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केले आहे. कसबे डिग्रज गावामध्ये अद्यावत रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस होता. सर्व तयारी झाली होती मात्र, एकनाथ शिंदे यांनी एक्का काढला आणि आम्ही मांडलेला पत्त्यांचा डाव हरलो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हस्स्यकल्लोळ झाल्याचे पाहायला मिळालेय. आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना महामारी आल्यानंतर आपल्याला सुविधांचे महत्त्व कळले, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Published on: Sep 05, 2023 01:30 PM
‘Devendra Fadnavis यांना भीती, म्हणून माफी मागितली’, एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
Vijay Wadettiwar मराठा आणि ओबीसी आरक्षणावर स्पष्टच म्हणाले, ‘माझ्या जीवात जीव असेपर्यंत…’