संयोगिताराजे प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड भडकलेले अन् केली ‘ही’ मोठी मागणी
VIDEO | तुम्ही जाणीव करून दिली की आम्ही..., संयोगिताराजे यांच्या पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड भडकलेले आणि स्पष्टच बोलले
ठाणे : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्यासोबत काळाराम मंदिरात घडलेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, सनातनी वृत्ती अद्यापही असल्याचे म्हणत त्याच्यावर आम्ही बोलणारच म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त हे बंद करा म्हणत असे भेदभाव केलेल चालणार नाही. आणि त्यावर बोलाल तर आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही. संबंधित पुजारी यांनी छत्रपती घराण्याचे अपमान केला आहे त्यामुळे इतरांचे काय असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर संविधानाने जसं सर्वांना समान केलं आहे तसं धर्मानेही सर्वांना समान करावं. काळाराम मंदिर आम्हाला जाणीव करून देत आहेत की आम्ही शूद्र आहोत. आम्ही शूद्र आहोत याची मला अजिबात लाज वाटत नाही. याच्यापढे सगळ्यांनाच वेदोक्त लागू होईल असे जाहीर करून टाका असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे.