भाजप स्वबळावर लढणार, RSS आणि भाजपच्या बैठकीत काय ठरला प्लॅन? जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट
जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. भाजप विधानसभा स्वबळावरच लढणार असे म्हणत संघा सोबतच्या बैठकीत भाजपचं ठरल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. असं म्हणत निवडणुकांसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. भाजप विधानसभा स्वबळावरच लढणार असे म्हणत संघा सोबतच्या बैठकीत भाजपचं ठरल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. असं म्हणत निवडणुकांसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकट्यानंच लढावं असं संघ आणि भाजपच्या बैठकीत ठरल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. नागपूरचं अधिवेशन संपताच जितेंद्र आव्हाड यांनी धमका केलाय. ‘नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.’ असं ट्वीट आव्हाडांनी केलं.