Special Report | अजित पवार यांच्या निशाण्यावर कोण? कुणाला दिलं पुन्हा मस्ती उतरवण्याचं चॅलेंज?
VIDEO | पुन्हा एकदा संघर्ष सुरू, अजित पवार यांनी कुणाला दिला मस्ती उतरवण्याचा इशारा? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी मस्ती उतरवण्याचा इशारा दिलाय. तर कुणात मस्ती आली, तर ती मस्ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे. तर, विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना पार्थ पवार यांच्या पराभवाची आठवण करून दिली. तर गाव पेटवायला एक काठी ओढणारा नालायक लागतो. गाव वसवायला शंभर लोकं लागतात. विजय शिवतारे तेवढाच ताकदीचा आहे. त्यामुळे मी अजिबात गप्प राहणार नाही, असं प्रत्युत्तर विजय शिवतारे यांनी दिलं. दरम्यान, अजित पवार आणि त्यांते कट्टर राजकीय वैरी विजय शिवतरे हे पुन्हा आमने-सामने आलेत. अजित पवार यांनी सकाळ माध्यम समुहाला एऱ मुलाखत दिली. यामध्ये २०१९ च्या पुरंदर विधानसभा निवडणुकीची आठवण करून देण्यात आली. अजित पवार यांनी त्या निवडणुकीत विजय शिवतारे यांना पराभूत करण्याचे जाहीर आव्हान दिले होते. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट