अजित पवार भाजपच्या वाटेवर? राजकीय भूकंपाच्या चर्चांवर स्पष्ट म्हणाले, ‘मी आमदारांची बैठक बोलवली…’

| Updated on: Apr 18, 2023 | 9:51 AM

VIDEO | राजकीय वर्तुळातील राजकीय भूकंपाच्या चर्चांनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा होतेय ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार… मात्र यावर अजित पवार यांनी ट्विट करून थेट स्पष्टीकरणच दिले आहे. ते म्हणाले, खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. तर सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

Published on: Apr 18, 2023 09:43 AM
पुणेकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद, कधी नसणार पाणी?
अजित पवार शरद पवार यांच्याच परवानगीने भाजपमध्ये जाणार; ‘या’ आमदाराचा दावा