गौतमी कुणासमोर पण नाचेल, तुला का त्रास होतोय?, अजित पवार यांचं पुन्हा मश्किल भाष्य अन्…

| Updated on: Apr 29, 2023 | 10:40 AM

VIDEO | गौतमी पाटील हिच्यासंबंधित 'त्या' प्रश्नावर अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले?

पुणे : गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. मात्र पुण्यातील मुळशीत तर गौतमी चक्क एका बावऱ्या बैलासमोर थिरकताना दिसली. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमीने लावणी केली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, एका पत्रकाराने राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबाबतच प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मिश्कील प्रतिक्रिया देत या प्रश्नाचीच खिल्ली उडवली. यावेळी अजित पवार प्रश्न विचारणाऱ्यालाच म्हणाले, गौतमी पाटील बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास आहे? तिचं काम आहे ती करणार. बैल गाडामध्ये पहिला आलेला हा बैल आहे. त्यासाठीच हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. असं तिला सांगितलं असेल. त्यामुळे तिनेही नृत्य करण्यास होकार दिला असेल. त्यामुळे तुला वाईट का वाटतंय, कुणाला त्रास होण्याचं काय कारण आहे, असे म्हणत मिश्कील उत्तर दिले आणि उपस्थितांमध्ये एकच हस्यकल्लोळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांत ‘या’ दवाखान्यांमधून होणार मोफत उपचार
माझ्या मालकाच्या मुलाचं लग्न का होत नाही? यावर संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा; नितेश राणे यांचं वक्तव्य