अजित पवार नोटबंदीच्या पाठिशी? अजितदादांनी खास शैलीत केंद्र सरकारला नोटबंदीवरुन घेरलं
VIDEO | 2 हजाराच्या नोटबंदीवर अजित पवार यांची खास शैलीत खरमरीत टीका; म्हणाले...
कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रूपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यावरून देशात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. वारंवार नोटाबंदीचा निर्णय का घेतला जातोय. हे देशाच्या भल्यासाठी असेल तर जरूर तो निर्णय घेतला पाहिजे. पंरतु हा निर्णय का घेतला गेला हे आरबीआयने स्पष्ट केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत केंद्र सरकारवर टीका करत घेरल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वीही नोटाबंदी झाल्या, त्यावेळी लोकांनी खूप सहन केलं. यातून काळापैसा समोर येईल, डुप्लिकेट नोटांना आळा बसेल असे सर्वसामान्यांना वाटलं म्हणून त्यांनी ते सहन केलं. अजित पवार म्हणाले आता दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला गेला आहे. तीन महिन्यात या नोटा बंद होणार असल्याने लोकांना फार त्रास होईल असं वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे त्यांनी या नोटबंदीच्या निर्णयाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवल्याचे काहींचे म्हणणे आहे. देशहितासाठी काही निर्णय असेल तर आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आतापर्यंत कोणत्याही सरकारने घेतले नाही. आता केलेली दोन हजाराची नोट बंदी असाच प्रकार आहे. तुम्ही म्हणतात, यामुळे काळा पैसा बाहेर येईल. तसे असेल तर चांगलेच आहे. परंतु महिलांनी कुठेतरी जपून ठेवलेल्या नोटा असतात. त्या पुन्हा त्यांना बदलण्यास जावे लागले. अन् विसरल्या म्हणजे गेले पैसे…दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचे कारण काय? तेही केंद्र सरकार किंवा आरबीआयने सांगितले पाहिजे.