Special Report : सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये राणेंची भर, अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून राणे आणि अजित पवारांमध्ये सुरु झालेली शाब्दिक चकमक काही थांबताना दिसत नाहीये. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवताच, राणेंनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं होतं. आता भाजपाचा मुख्यमंत्री असेल असे राणे यांनी म्हटले होते. यावर अजित पवारांनी आता राणेंना आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिले आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत, महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव करताच, राणेंनी थेट राज्य सरकारलाच आव्हान दिलं होतं. महाविकास आघाडीला लगानची टीम म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसवणार, अशा शब्दात राणेंनी सरकारला डिवचलं होतं. मात्र आता राणेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. सरकार पडेल हे सांगणाऱ्यांमध्ये राणेंची नवी भर पडली आहे. अशा खोचक शद्बांमध्ये पवारांनी राणेंवर निशाणा साधला आहे.