सत्तानाट्याला फूलस्टॉप? अजित पवार यांच्या खुलाशानंतर पक्षात ना फूट ना सत्तेची पहाट

| Updated on: Apr 19, 2023 | 8:06 AM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या खुलाशानं ना फूट पडणार आणि ना पुन्हा पहाट उगवणार हे स्पष्ट, तरीही चर्चा कायम; बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : अजित पवारांच्या खुलाशानंतर सध्या तरी ना फूट पडलीय, आणि ना ही पुन्हा सत्तेची पहाट उगवण्याची चिन्हं आहेत. मात्र या संभाव्य चर्चांना शिंदे गटातली मतभिन्नता समोर आली. या चर्चेमुळे ठाकरे गटाच्या राऊतांनीही वेगवेगळी मतं वर्तवल्याचे समोर आले आहे. अजितदादांचा वकूबच असाय, की जरी काही काळ त्यांचा फोन बंद झाला, तरी सत्ताकारणाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरु लागतात. काही सुपातले जात्यात जातात. तर काही जात्यातले सुपात येतात. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनीच शहाजी बापू पाटील नॉट रिचेबल झाले. या चर्चांनी शिंदे गटातली चलबिचल प्रकर्षानं समोर आली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी जवळपास सत्तेच्या नव्या लग्नाच्या मुहूर्ताचं भाकीत केलं.

राष्ट्रवादी सत्तेत परतल्यास आनंदराव अडसूळांनी स्वबळाचा इशारा दिला. अजित पवार युतीसोबत आल्यास शंभुराज देसाईंनी स्वागताची तयारी ठेवली. संजय शिरसाटांनी आधी अजित पवारांसोबत सत्तेत बसणार नसल्याची भूमिका मांडली. नंतर जर अजित पवार भाजपात आले तर स्वागत करु असं म्हणाले. संजय गायकवाड यांनी अजित पवारांचं स्वागत आहे, पण मुख्यमंत्री शिंदेच राहणार असं सांगितलं. तर विजय शिवतारेंनी अजितदादांनाच शिंदे गटात येण्याची ऑफर दिली. राज्यात नेमकं घडतंय तरी काय बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 19, 2023 08:06 AM
अजित पवार, बंडाची चर्चा अन् भाजपची भूमिका; सामनातून राजकीय परिस्थितीवर भाष्य
उगाच माझ्या वाटेला येऊ नका, 2024 ला एकदाच कार्यक्रम करून टाकू!; नितेश राणे यांचा कुणाला इशारा