अजित पवार पुन्हा सक्रिय अन् बारामतीच्या दौऱ्यावर; सकाळी ६ वाजताच आढावा दौऱ्यावर
VIDEO | अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय भवन परिसरात पाहणी, पुन्हा सक्रिय होत घेतला विकास कामांचा आढावा
बारामती : राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजल्यापासून बारामतीमधल्या विविध विकास कामाची पाहणी करून विकास कामाचा आढावा घेतला आहे. बारामती दौऱ्यावर असताना अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय भवन परिसरात पाहणी सुरू असताना अजित पवार प्रस्तावित कामासंदर्भात अधिकारीवर्ग आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतांना दिसताय. तर गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार विकास कामासंदर्भात पाहणी दौरा करताना सकाळी ६ वाजल्यापासूनच आपला पाहणी दौरा सुरू करताना दिसताय. आता देखील त्यांनी आपला दौरा सकाळीच सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्याबाबत चर्चा होत होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी त्या चर्चांवर पूर्णविराम देत पुन्हा आपल्या कामात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.