अजित पवार नाराज छगन भुजबळांनी मनधरणी करणार? नाराजी दूर करण्यासाठी दादांसह ‘हे’ दोन नेते भेट घेणार

| Updated on: Dec 18, 2024 | 1:21 PM

गेल्या दोन दिवसांपासून गैरहजर असलेले अजित पवार हे आज विधिमंडळात दाखल होणार आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे.

गेल्या रविवारी महायुती सरकारचं पहिलं मंत्रिमंडळ विस्तार झालं. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी कार्यक्रमात महायुतीच्या एकूण ३९ जणांनी मंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. यामध्ये महायुती सरकारकडून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही ज्येष्ठ आणि अनुभवी बड्या नेत्यांचा पत्ता कट केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश असून सध्या ते नाराज आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली अशातच त्यांनी हिवाळी अधिवेशनात जाणंही टाळलं. तर “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य करत त्यांनी बंडाचे संकेतही दिलेत. अशातच आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. अजित पवार लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून गैरहजर असलेले अजित पवार हे आज विधिमंडळात दाखल होणार आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय.

Published on: Dec 18, 2024 01:21 PM