खारघर दुर्घटनेत लोकांना गमावलंय, त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका; अजित पवार यांचं सरकारला आवाहन
VIDEO |रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबतचं अजित पवार यांचं ट्विट, सरकारला नेमकी काय केली विनंती?
मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबतचं सर्वेक्षण स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, असे आवाहन देखील अजित पवार यांनी ट्विट करत केले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील एक ट्विट करून अजित पवार म्हणाले, बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक ठाम आहेत. त्यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.