Special Report | अजित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यानं गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, नेमंक काय म्हणाले?

| Updated on: Apr 26, 2023 | 7:58 AM

VIDEO | गौतमी पाटीलच्या त्या प्रतिक्रियेवर अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नाव न घेता गौतमी पाटीलवर टीका केली होती. मात्र आता कार्यकर्त्यांना उद्देशून चिमटा काढला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणानं गौतमी पाटील चर्चेत राहतीय. बारामतीत एक कार्यक्रम होता. एका लग्नाच्या तिथीवरुन विषय सुरु असताना समोरच्या कार्यकर्त्यानं विषय छेडला आणि नंतर अजित पवारांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवायचा का? म्हणून टोला मारला. याआधी नृत्यावेळी अश्लील हावभावांमुळे अजित पवारांनी नाव न घेता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादीचेच काही पदाधिकारी पक्षाचं बोर्ड लावून कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे अजित पवारांनी त्याबद्दल नाराजीही वर्तवली होती. मात्र आपण फक्त लावणीच नाही तर नृत्याचे इतर सर्व प्रकार सादर करतो आणि नृत्यावेळी अश्लिल हावभाव पूर्णपणे बंद केल्याचं गौतमी पाटीलनं म्हटलं होतं. गावाकडच्या जत्रा आणि इतर कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटील आणि तिच्या टीमला मोठी मागणी आहे. एरव्ही दरवर्षी जिथं मराठी अभिनेत्रींना बोलावलं जायचं, तिथं आता गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित होतायत. म्हणूनच नेत्यांपासून कीर्तनकारांपर्यंत आणि अभिनेत्रींपासून ते तमासगिरांपर्यंत अनेकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर टीका केली होती.

Published on: Apr 26, 2023 07:24 AM
Special Report | कोणत्या राज्यात होतेय भाजपची पकड ढिली, काय सांगतो सर्वे; काँग्रेस कशी होतेय वरचढ
Special Report | … म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवस सुट्टीवर गेले, बघा काय आहे कारण?