Special Report | मुख्यमंत्रिपदाची इच्छा अन् अजित पवार यांना भाजपची ऑफर?

| Updated on: Apr 23, 2023 | 7:42 AM

VIDEO | मुख्यमंत्रिपदावरून अजित पवार यांचं भाष्य, २०२४ ला मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार का? अजित पवार यावर नेमकं काय म्हणाले?

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काही न् काही कारणांवरून चर्चेत आहे. त्यातच अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावरून उघडपणे इच्छा व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या या इच्छेवर भाजपने थेट त्यांना अप्रत्यक्ष ऑफरच दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून अजित पवार यांनी थेट भाष्य केलं आणि राजकीय वर्तुळात पुन्हा अजित पवार चर्चेचं कारण बनले. २०२४ ला मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले २०२४ काय आताही दावा ठोकण्याची तयारी असल्याचे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करताच पुण्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केली. अजित पवार यांच्या या इच्छेवर संजय राऊत २०२४ मध्ये बघू असे म्हणाले तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी १४५ आमदारांच्या बहुमताची आठवण करून दिली. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 23, 2023 07:40 AM
Special Report | जळगावातले चारही आमदार फुटले! आता उद्धव ठाकरे कोणाला धुणार? सभेपुर्वीच चर्चा रंगली
भाजप नेत्याचा विश्वास 2024 ला पीएम हा भाजपचाच आणि मोदीच होणार