‘पुढील १० वर्ष तरी काँग्रेस, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार नाही’, कुणी केला थेट दावा

| Updated on: Jun 05, 2023 | 4:13 PM

VIDEO | अजित पवार राष्ट्रवादीत राहून मुख्यमंत्री होणार नाही, कुणी केला दावा?

पुणे : महाविकास आघाडीमध्ये एक बॅनरबाजीचं चांगलंच पेव फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे, नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर भंडाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री असल्याच्या उल्लेखाचे बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्या रस्सीखेच स्पर्धेत महाविकास आघाडी टीकेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतरे यांनी मोठं विधान केल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पुढील १० वर्ष तरी होणार नाही. भाजपचंच पुन्हा सरकार येणार…असा विश्वासही व्यक्त केला. तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे असे राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून वाटत असताना अजित पवार हे राष्ट्रवादीत राहून कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचे विजय शिवतरे यांनी म्हटले आहे. तर अजित पवार हे कर्तबगार नेते आहेत मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले तर ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाची विजय शिवतरे यांनी केल्याचे आज पाहायला मिळाले.

Published on: Jun 05, 2023 04:11 PM
“बारामतीच्या नेत्यांनी देशाला ब्लॅकमेल करण्याचं काम केलं”, कोणी केली पवार कुटुंबावर टीका?
७ वर्षाच्या अर्णवीचा ‘या’ नृत्यात रेकॉर्ड, बघा का झाली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद?