‘मंत्रिमहोदयांना गांभीर्य नाही’, विजय कुमार गावित यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमोल मिटकरी भडकले

| Updated on: Aug 21, 2023 | 8:44 PM

VIDEO | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित पुन्हा चर्चेत, 'महाराष्ट्राच्या काही भागात खूप कुपोषणग्रस्त लेकर आहेत त्यांची आवस्था त्यांनी पहावी, पण ते बघण्याऐवजी ते ऐश्वर्या रायची डोळे बघताय', राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित हे त्यांच्या अनोख्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ‘राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या वक्तव्याने हसावं की रडावं हेच कळत नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागात कुपोषण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात खूप कुपोषणग्रस्त लेकर आहेत त्यांची आवस्था त्यांनी पहावी, पण ते बघण्याऐवजी जर ते ऐश्वर्या रायची डोळे बघत असतली आणि ‘दररोज मासे खाल्ल्यानं ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल तर तुमचेही डोळे सुंदर होतील. त्यानंतर तुम्ही ज्याला पटवायचं त्याला पटवा’, असे सल्ले देण्यापेक्षा मेळघाटातील कुपोषित बालकांकडे लक्ष केंद्रीत करायला हवं, असे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. तर मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर असे लक्षात येते की, आदिवासी समाजाबद्दल, प्रश्नांबाबत मंत्रिमहोदयांना गांभीर्य नाही’, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Published on: Aug 21, 2023 04:01 PM
सर्व्हर डाऊन? परीक्षा केंद्रावर गोंधळ? बच्चू कडू भडकलेच, केली थेट मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी
दरवर्षी 60 हजार लोकांचा सर्पदंशाने मृत्यू, भारतात कोणते सर्प सर्वांत विषारी अन् दंश झाल्यावर काय करावं?