दादा विरुद्ध ‘रडलो’ तरी मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो ! सुषमा अंधारे यांना कुणी लगावला खोचक टोला
VIDEO | 'रडरागिणी' म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना कुणी लगावला टोला?
मुंबई : साताऱ्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. यावेळी शरद पवार यांच्या समोरच सुषमा अंधारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अंधारे यांनी डोळ्यातून पाणी आणत अजित पवार यांच्याविरोधात तक्रार केली. माझ्याविरोधात सत्ताधारी इतके आक्षेपार्ह बोलले तरी विरोधी पक्षनेते सभागृहात होते तरी काही बोलले नाही, असा आरोप त्यांनी केला. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारे यांना खोचक टोला लगावला आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट करत सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. मिटकरी म्हणाले, सकाळी 6 पासून सातत्याने जनतेच्या सेवेत असणारे नेते म्हणजे अजितदादा आहेत. हल्ली त्यांच्यावर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आलाय. दादा विरुद्ध रडलो तरी आता मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो… आणि रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते असे म्हणत त्यांनी #रडरागिणी असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.