‘हेच का तुमचे….’, अमोल मिटकरी यांचा टि्वट करत भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा

| Updated on: Jun 11, 2023 | 10:04 AM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपच्या बड्या नेत्यावर ट्विट करत हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ट्वीट करत निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळालेल्या धमकीवर अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांना धमकी देणाऱ्या धमकीचा मास्टरमाईंड तुमचा तर नाही ना? असा सवालही त्यांनी केला आहे. ‘अहो विश्वगुरू बावनकुळे साहेब तुमच्या पक्षातील पिंपळकरचे “भाजपिय” संस्कार बघा.एकीकडे रामायण महाभारत आणि हिंदुत्वाच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे इतक्या खालच्या पातळीवर बोलणाऱ्या विकृत इसमाचे समर्थन करायचे हेच का तुमचे हिंदुत्व? धमकीचा मास्टर माईंड तुमचा तर नाही ना?’, असं अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले आहे.

Published on: Jun 11, 2023 09:49 AM
पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर पुणे पोलिसांनी घेतली कोणती खबरदारी? काय केलं?
प्रतिक्षा संपली! आज मुंबईत पावसाच्या सरी बरसणार, हवामान खात्यानं म्हटलं…