‘माझ्या उंचीपेक्षा कमी उंची असणाऱ्यांशी मी बोलत नाही’, नितेश राणे यांना कुणाचा टोला?
VIDEO | 'हिंदू राष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य यातील फरक सिद्ध करून दाखवा', मोहन भागवत यांना NCP नेत्याचा इशारा
अकोला : सत्तेचं गलिच्छ राजकारण करायला त्यांनी 2 जून ला हा राज्याभिषेक सोहळा घेतला असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे. तर आम्ही दिलेल्या पत्रालाही त्यांनी केराची टोपली दाखल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. तर मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले, मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य यातील फरक समजून घेऊन नंतर बोलावे. शिवरायांनी निर्माण केलेल राज्य हे कुठल्या एका समाजाचं नसून रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य होतं. मोहन भागवत हे नवीन इतिहास संशोधक आहेत. माझी त्यांना विनंती आहे कि यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य यातील फरक सिद्ध करून दाखवावा. यासह नितेश राणे यांनी मिटकरी यांच्यावर आरोप करत मिटकरी हे चेक घेऊन काम करतात. तर आमचा चेक बाउन्स नाही होत, असा टोलाही नितेश राणे यांनी मिटकरी यांना लगावला आहे. त्यावर मिटकरी यांनी रितेश राणे यांचा चांगला समाचार घेत माझी उंची पाच फूट सहा इंच असून माझ्या उंचीपेक्षा कमी उंची असणाऱ्या माणसांशी मी बोलत नसल्याचा टोला ही अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंना लगावला आहे.