Amol Mitkari | किरीट सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे आहेत : अमोल मिटकरी
कायदा व सुव्यवस्था तसेच किरीट सोममय्या यांना कोणतीही इजा किंवा त्रास होऊ नये म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे, असे मिटकरी यांनी सांगितले आहे. तसेच सोमय्या यांनी घरीच थांबाव, अन्यथा महागात पडू शकतं असा सूचक इशाराही मिटकरी यांनी दिलाय.
मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापूर प्रवेशबंदीची नोटीस आल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मला अटक करण्यासाठी माझ्या घरासमोर मोठा फौजफाटा आलेला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध केलं आहे, असं म्हणत निषेध केला आहे. या सर्व आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप तसेच किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधलाय. कायदा व सुव्यवस्था तसेच किरीट सोममय्या यांना कोणतीही इजा किंवा त्रास होऊ नये म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे, असे मिटकरी यांनी सांगितले आहे. तसेच सोमय्या यांनी घरीच थांबाव, अन्यथा महागात पडू शकतं असा सूचक इशाराही मिटकरी यांनी दिलाय.