पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा कचा कचा… अजितदादांची फुल बॅटिंग
अजित पवार आज इंदापुरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत जोरदार भाषण केलं. आम्ही इंदापूरकरांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. गावचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी हवा तेवढा निधी देऊ. पण आमच्यासाठीही कचा कचा कचा बटन दाबा, असं अजित पवार म्हणाले अन् ....
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापुरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत जोरदार भाषण केलं. आम्ही इंदापूरकरांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. गावचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी हवा तेवढा निधी देऊ. पण आमच्यासाठीही कचा कचा कचा बटन दाबा, असं अजित पवार म्हणाले. अजितदादांनी हे विधान करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी पुण्यात होणाऱ्या सभेचा तपशीलच दिला. उद्या देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात सभा होणार आहे. तसेच उद्याच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे. सातारा आणि सांगली येथे महायुतीच्या उमेदवाराचाही उद्या अर्ज भरला जाईल. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे, असं सांगतानाच लोकसभा निवडणूक ही 140 कोटी जनतेची निवडणूक आहे. ही काही गावकीची निवडणूक नाही, असंही अजितदादांनी सांगितलं. पुढे अजित पवार असंही म्हणाले, 500 वर्षात राम मंदिर झाले नाही ते अनेक जणांचे स्वप्न होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. मी सत्तेला हापापलेलो नाही. मी सहा वेळा उपमुख्यमंत्री झालोय. माझं रेकॉर्ड मला नाही वाटत कोणी मोडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.