Ajit Pawar | मी मुंबईत जाऊन माहिती घेतो, किरीट सोमय्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मी मुंबईत जाऊन माहिती घेतो, किरीट सोमय्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 19, 2021 | 8:54 PM

कोरोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो. हा कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला आहे या प्रकरणी माहिती घेतो त्यानंतर मी प्रतिक्रिया देतो, असे अजित पवार यांनी सांगितले. 

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता त्यांनी किरीट सोमय्या प्रकरणी मुंबईला गेल्यानंतर ह्याची माहिती घेऊन सांगेन असे ते म्हणाले. पुण्यातील बालेवाडी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. मला याबद्दल काहीच माहिती नाही मी विकास कामाला महत्त्व देतो आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो आणि विकास कामाला महत्त्व देतो लोकांच्या कामाला आणि अडीअडचणीला महत्त्व देतो. लोकांचे लक्ष वेगळ्या कारणाने दुसरीकडून डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न काय आहेत ते पहा. कोरोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो. हा कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला आहे या प्रकरणी माहिती घेतो त्यानंतर मी प्रतिक्रिया देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

Kirit Somaiya | कोणत्याही परिस्थितीत मी कोल्हापूरला जाणारच, सोमय्यांची टिव्ही 9 माहिती
Kirit Somaiya | किरीट सोमय्या CSMT स्थानकावर पोहोचल्यानंतरच्या काय-काय घडलं ते बघा