ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावं नसतात; छगन भुजबळ यांचं वादग्रस्त विधान अन् पुन्हा वाद पेटणार?

| Updated on: Aug 19, 2023 | 11:15 PM

VIDEO | 'आम्ही सरस्वती, शारदा देवीला पाहिलं नाही अन् आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं नाही', राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद पेटणार?

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वादानं पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. ब्राह्मण समाजात शिवाजी आणि संभाजी नावं ठेवले जात नाही, असं वादग्रस्त विधान केलं. तर ‘आपल्याला शिक्षण दिलं. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांनी. त्याचं कायद्यात रुपांतर केलं ते बाबासाहेब आंबेडकर यांनी. भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली. बाकीच्यांना सरस्वती आवडते, काहींना शारदा आवडते. आम्ही काय पाहिलं नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिलं नाही. आम्हाला शिक्षण दिलं ते या महापुरुषांनी दिलं. त्यामुळे ते आमचे देव आहेत. ते तुमचेही देव असले पाहिजेत.’, असे छगन भुजबळ म्हणाले. यासह ते बोलत असताना त्यांचा निशाणा संभाजी भिडे यांच्यावर होता. मात्र भिडे यांच्यावर टीका करताना समाजाचा उल्लेख करताना छगन भुजबळ यांच्या कुटुंबात कुणाचं नाव शिवाजी आहे असा प्रश्न हिंदू महासंघाकडून उपस्थित करण्यात आलाय.

Published on: Aug 19, 2023 11:15 PM
नऊ वर्षाची चिमुकली, तिने घातली उंच शिखराला गवसणी, फडकवला भारताचा तिरंगा…
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार v/s अजित पवार, शरद पवार यांच्याविरोधात अजितदादांचा अॅक्शन प्लॅन काय?