Anil Deshmukh यांनी सांगितला ‘तो’ अनुभव; म्हणाले, ‘… तरीही मला १४ महिने जेलमध्ये ठेवलं’
VIDEO | शरद पवार यांच्या आजच्या जळगावात जाहीर सभेतून अनिल देशमुख यांचा सत्ताधारी पक्ष आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल, ईडीच्या छाप्यासह जेलच्या अनुभवाबद्दलही भाष्य करताना देशमुख म्हणाले...
जळगाव, ५ सप्टेंबर २०२३ | खान्देशातील जळगाव जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. यासभेतून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जोरदार भाषण केलं. अनिल देशमुख यांनी आपल्या भाषणातून भाजपसह अजित पवार यांच्या गटातील नेत्यावर सडकून टीका केली. तर त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या ईडीच्या छाप्यासह जेलच्या अनुभवाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेचे काही आमदार 50 खोक्यांच्या आमिष दाखवल्याने गेले तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ईडीच्या धाकाने त्यांच्यासोबत गेले, असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.
आपल्या जेलच्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मला 14 महिने जेलमध्ये ठेवलं. माझ्यावर 100 कोटींचा आरोप झाला. ईडीने चार्जशीटमध्ये 1 कोटी 71 लाखांचा आरोप केला. 100 कोटीवरुन 1 कोटी 71 लाखांवर आले. मला 14 महिने जेलमध्ये ठेवलं. माझ्याकडे समझौता करायला आले तेव्हा मी आयुष्यभर जेलमध्ये राहील असं सांगितलं, पण तुमच्यासोबत समझौता करणार नाही.’