अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा घरी येणार, कार्यकर्ते सज्ज; बघा कशी सुरूये तयारी?

| Updated on: Feb 10, 2023 | 1:20 PM

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज, बघा व्हिडीओ कशी सुरूये तयारी

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तब्बल दोन वर्षानंतर उद्या नागपूरात येत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उत्साही आहे. अनिल देशमुख यांचा नागपूरातील बंगल्याची सजावट सुरू आहे. बंगल्यावर लायटिंग लावली जात असून, पेंटिंगचं काम सुरु आहे. शिवाय त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची वर्दळंही वाढली आहे. उद्या राष्ट्रवादीची नागपूरात बाईक रॅली आहे. अनिल देशमुख उद्या नागपूरात येत आहेत, हाच आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Published on: Feb 10, 2023 01:20 PM
गुलाबाच्या पायघड्या, हेलिकॉप्टरमधून स्वागत, पाहा बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नाचा ‘हा’ खास व्हायरल व्हिडिओ
आणखी १५ आमदार फुटणार ? बच्चू कडू यांचा दावा, संजय राऊत म्हणाले बरोबर पण…