सलमान खान नंतर बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन अन्…

| Updated on: Nov 07, 2024 | 4:17 PM

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड विश्वातील अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर आता बॉलिवूडच्या किंग खानच्या जीवाला धोका आहे. शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड विश्वातील अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानला कित्येकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अशातच माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. असे असताना सलमान खानचा येणाऱ्या धमक्या थांबायचे काही नाव नाही. मात्र आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानच्या जीवाला देखील धोका असल्याची माहिती मिळत आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला असून या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता शहारूख खानला मिळालेल्या धमकीच्या फोननंतर या प्रकरणाचे कनेक्शन छत्तीसगड रायपूर येथील असल्याचे समोर आले आहे. छत्तीसगड रायपूर येथे राहणाऱ्या फैझान नावाच्या व्यक्तीने शहारूख खानला हा धमकीचा फोन केला होता. याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांची टीम चौकशी करण्यासाठी रायपूरला दाखल झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Published on: Nov 07, 2024 04:17 PM
‘राऊतांना ‘सिल्व्हर ओक’चा बुलडॉग म्हटलं तर चालेल का?’, भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक सवाल
‘इंजिन अन् मनसे घेऊन बसा, तुम्हाला बाकी काय…’, पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर