शेतकऱ्यांचा आयुष्याचा बेरंग मात्र नेते रंग उधळत होते, छगन भुजबळ भडकले; काय केली गंभीर टीका

| Updated on: Mar 08, 2023 | 11:28 AM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ राजकीय नेत्यांच्या धुळवडीवरुन आक्रमक, केली सडकून टीका, बघा व्हिडीओ

मुंबई : अवकाळी पावसाने राज्यभरात चांगलाच धुमाकूळ घातला या पावसाने शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान द्यावे, अशी मागणी करत अवकाळी पाऊस आणि होळी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याच्या संसाराची होळी झालेली आहे आणि इकडे नेते धुळवडीचे रंग उधळत होते, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे. राज्यात नाफेडकडून केली जाणारी खरेदी ही बाजारसमितीत जाऊन केली जात नाही. परस्पर कंपनीच्या माध्यमातून बाहेरच्या बाहेर खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर आज विधानसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले असून कांदा प्रश्नी छगन भुजबळ पुन्हा आक्रमक होणार आहे.

Published on: Mar 08, 2023 11:27 AM
जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर अजित पवार यांनी का बर व्यक्त केली खंत
संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई होणार? विधानभवनात महत्वपूर्ण बैठक