Chhagan Bhujbal : अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे अनेक मोठे खुलासे
छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली असताना यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. यानंतर छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली असताना यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी दोघांनी अर्धा तास चर्चा केल्याचे पाहायला मिळाले. या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचे कारण विचारले. यावर छगन भुजबळांनी सविस्तर भाष्य केले. इतकंच नाहीतर राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टच उत्तर दिले. “मला जे काही बोलायचं ते सर्व बोललो आहे. मी यावर अधिक काही बोलणार नाही”, असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले. बघा काय-काय केले आणखी मोठे खुलासे?