Dhananjay Munde घरावर मोर्चा काढून उत्तर मिळणार नाही
एकीकडे आझाज मैदानात जल्लोष करण्यात आला, मग दुसरीकडे शरद पवार यांच्या घरासमोर आचानक आंदोलन कसे करण्यात आले? हा तर लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचा प्रकार झाल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
मुंबई : ‘पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने राहिले. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाहीत. आजचे आंदोलन अतिशय दुर्दैवी आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांना कदाचीत इतिहास माहित नसावा. शरद पवार यांनी कामगाराच्या कल्याणासाठी आपली हयात घालवली. आज त्यांच्या घरावर जे आंदोलन झाले ते संशयास्पद आहे. एकीकडे आझाज मैदानात जल्लोष करण्यात आला, मग दुसरीकडे शरद पवार यांच्या घरासमोर आचानक आंदोलन कसे करण्यात आले? हा तर लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचा प्रकार झाल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.