अजित पवार भाजप पक्ष प्रवेश करणार की नाही? राष्ट्रवादीच्या नेत्यानं थेट सांगितलं, ‘ते भाजपमध्ये जातील…’
VIDEO | अजित पवार भाजपच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण, नेत्यांनी मांडली आपली भूमिका
बुलढाणा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात जोरदार उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ अजित पवार भाजपमध्ये जाणार हे मीडियाने रंगवलेले चित्र आहे. सध्या अजित पवार हे एक तास जरी नॉट रिचेबल असेल तरी ब्रेकिंग न्यूज होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशातला काही भाग नसावा आणि त्यांच्या मनातही असे काही असेल, असे वाटत नाही’, असे स्पष्टपणे त्यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी अजित पवार यांना जाहीरपणे आपला पाठिंबा दर्शवल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांना त्यांची भूमिका कशी असेल अशी विचारणा करण्यात आली, यावर त्यांनी उत्तर देणे टाळले. पण शरद पवार साहेब हे सातत्याने भाजप विरोधात एकसंघ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे वेगळे काहीही होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.