एकनाथ खडसे यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा, “विरोधकांना छळण्याचे…”
VIDEO | विरोधकांना ना उमेद करण्याचे प्रकार सुरु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा भाजपवर निशाणा
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. राज्यात सध्या विरोधकांना शत्रूसारखं वागवलं जात असल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यामागे ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणा त्यांच्या मागे लावल्या जात आहेत. अशा प्रकारे तपास यंत्रणा पाठीमागे लागून विरोधकांना छळण्याचे प्रकार घडत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीय राजकारणाबद्दल विचारले असता त्यांनी जळगावात अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “प्रत्येक पक्षामध्ये जातिवाद फोफावला आहे. त्याला कोणताही पक्ष काही अपवाद आहे अशी स्थिती आजचे नाहीये. पण जातियवादापेक्षा महत्त्वाचं असा आहे की, जे समोर विरोधी पक्षाचे ते शत्रू सारखे वागवले जात असून त्यांना त्रास देण्याचे प्रकार होत आहेत आणि विरोधकांना नाउमेद करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेले आहेत.”